भुसावळ : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी दिल्ली येथहू अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आली असून लाहोटी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे लाहोटी यांनी यापूर्वी मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात सन 2000 मध्ये वरीष्ठ अभियंता (समन्वय) या पदावर सेवा दिली आहे. यामुळे प्रवासी हिताचे मोठ्या प्रमाणावर निर्णय होतील, असा आशावाद व्यक्त होत आहे.



