ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

भुसावळ –
ऑर्डनन्स फॅक्टरी सुभाषनगर परिसरामध्ये वृक्षारोपण महाप्रबंधक वसंत निमजे यांच्या हस्ते गुरुवार रोजी करण्यात आले वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल यावर त्यांनी संबोधन केले प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे असे त्यांनी सर्वांना आव्हान केले

यावेळी सर्व वरिष्ठ अधिकारी अनुभाग प्रमुख सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी जे.सी.एम.थ्री (३)मेंबर
जे.सी.एम.फोर्थ (४) मेंबर सर्व कार्यसमिति सदस्य सर्वांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमास उपस्थिती दिली
प्रसंगी यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरामध्ये हजारो हजारो झाडे लावू असा संकल्प सर्वांनी घेतला.