भुसावळ : ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ द्विवार्षिक कार्यसमिती निवडणूक 2021-23 साठी शनिवारी निवडणूक झाली. त्यात अखिल भारतीय संरक्षण कर्मचारी महासंघ संलग्न कामगार युनियन यांनी एकतर्फी बहुमतांनी 10 पैकी नऊ जागांवर विजय मिळविला. समोर मजदूर युनियन (इंटक) आणि आयुध निर्माणी कर्मचारी संघ (बी.एम.एस.) यांचे संयुक्त पॅनल होते. त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला.

मागील कार्य समितीमध्ये संबंधिताचे 5 सदस्य निवडून आले होते. कॉ.दिनेश राजगिरे, किशोर पाटील, जनरल सेक्रेटरी नवल भिडे यांच्या नेतृत्वात आणि अध्यक्ष कॉ.राजेंद्र झा यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार युनियनने 2013 नंतर मोठा विजय मिळवला आहे. यात प्रमुख प्रवीण मोरे, हिरालाल पारीसकर, आर.एन.जैन, विनोद तायडे (एससी एसटी ओबीसी एसोसिएशन) संजय अहिरे, लक्ष्मण वाघ (बीएसकेएस), महेंद्र पाटील, दीपक वाघ, एस.बाविस्कर आदी दहा विजयी उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचे के.एम.बढे, नवल भिडे, वाय.एस.आंबोडकर, राजकिरण निगम, अतुल पाटील, एन.बी. देशमुख, के.के.कोळी, एस.डी. गाढे, राहुल पाटील, बीएमएसचे पंकज पाटील आदींनी अभिनंदन केले.


