ओबीसी आरक्षण अबाधितसाठी चाळीसगाव तेली समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ; तहसीलदार अमोल मोरे यांना दिले निवेदन :


चाळीसगाव –
चाळीसगाव येथील शहर तेली समाज , तालुका तेली समाज आणि महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले,
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द केलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवणे करिता आवश्यक ईम्पिरिकल डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा व केंद्र/राज्य सरकार द्वारा ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करावा.
मा.सुप्रीम कोर्टाने दिनांक २८ मे २०२१ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीबाबत ओबीसींचे आरक्षण रद्द ठरविल्याचा आदेश दिला आहे.त्या आदेशानुसार महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे २७% राजकिय आरक्षण हे रद्द झालेले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हापरिषद,नगरपरिषद व महानगरपालिका यामधे ओबीसी समाजाला जे प्रतिनिधित्व मिळत होते ते राज्य सरकारने कोर्टाला इम्पिरीकल डाटा आजपावेतो सादर केला नाही म्हणून सदर आरक्षण रद्द केले आहे.
हा ओबीसी समाजावर घोर अन्याय झालेला आहे.
हा अन्याय दूर करावा यासाठी महाराष्ट्र राज्य तेली समाजाचे प्रत्येक तालुक्यात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवार रोजी चाळीसगाव तेली समाजाने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले .यावेळी चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड , यांना निवेदन देण्यात आले .
प्रसंगी महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे नेते किसनराव जोर्वेकर, तेली समाजाचे शहर अध्यक्ष दिलीप चौधरी, तालुका अध्यक्ष सुरेश चौधरी, सेक्रेटरी बापू पवार,
राजेंद्र रामदास चौधरी. पंडित आणा चौधरी ,विजय शिवाजी चौधरी.,सदानंद चौधरी अविनाश नाना चौधरी , आर डी चौधरी,अॅड मनोज पितांबर वाघ, राजेंद्र काशिनाथ, रवींद्र गिरिधर , बाळासाहेब चौधरी सुरेश देवलाल चौधरी,सुनील रुपचंद चौधरी, संजय खंडू चौधरी सागर आबासाहेब चौधरी,रामेश्वर बाबुलाल चौधरी.विवेक मोतीराम चौधरी, महादू त्राबक चौधरी,संजय भगवान चौधरी,गौरव राजेंद्र चौधरी,आधार चौधरी,भागवत चौधरी, प्रशांत रामदास चौधरी सुनील भिवसान चौधरी भारत रमेश चौधरी. संजय चौधरी, व समाज बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *