श्रेयवादासाठी भाजपचा आटापिटा ; वरणगाव येथे कोविड सेंटर शिवसेनेच्या प्रयत्नानीच मंजुर – विलास मुळे ;


वरणगाव –
वरणगाव येथे कोविड सेंटर मंजुर प्रकरणी भाजपने जो आज आंदोलनाचा इशारा दिलेला आहे . तो निव्वळ श्रेयवादासाठी असून नाहक असा इशारा आहे जर यांना कोविड सेंटर मंजूर करायचेच होते तर यांची जेव्हा सत्ता वरणगाव नगर परिषेदेवर होती तेव्हा का यांनी मंजूर करून घेतले नाही आज शिवसेना जिल्हा प्रमुख व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने ते मंजूर झाले असून त्यांचे सर्व पत्र व्यवहार हे शिवसेनेकडे असून ते मंजूर करून घेतले आहे, नगर परिषद वरणगाव त्यावर काम करत असून लवकरच ते शिवसेनेच्या पाठपुराव्याने सुरू होणार आहे याचाच पुळका भाजपला उठला असून आता त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजप नौटंकी करत असून त्यांची ही नौटंकी व तोंड खुपसण्याचे चाळे बंद करावे, भाजपच्या स्थनिक नेत्यांनी वरणगावात कोविड सेंटर मिळवण्यासाठी कोणत्याही पत्रव्यवहार वा दस्तक समोर आणलेला नाही कारण असे कोणतेही पत्र व्यवहार त्यांनी केलेले नाही हे साध्य होते, पालकमंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेटच्या प्रयत्नांमुळे वरणगावात कोविड सेंटर मंजूर झालेले आहे व ते सुरू करण्याच्या सर्व प्रशासकीय हालचाली नगरपरिषद व आरोग्य विभाग सर्व हालचाली करत आहे असे सर्व असतांना भाजपला श्रेय लाटण्याचा पुळका येणे हे त्याच्या अस्तित्वासाठी साहजिक आहे, तरी त्यांनी कोणत्या तारखेला कोणत्या विभागाशी काय पत्रव्यवहार केलं याचे पुरावे वरणगाव शहर व परिसरातील नागरिकांसमोर आणले तर आम्ही व जनता ही मान्य करेल आणि तसे नसेल तर भाजप ने आता ही नसती उठाठेव बंद करावी असे शिवसेनेचे रावेर लोकसभा संघटक विलासमुळे यानी प्रसिद्धि पत्रकानव्ये कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *