भुसावळच्या इसमाची जळगावात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या ;

जळगाव –

जळगाव शहरातील बजरंग बोगदा पुलावर शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भुसावळ येथे हिंदी विद्यालयात कारकून असलेल्या युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली . आत्महत्येचे स्पष्ट कारण समजू शकले नाही . मात्र , कौटुंबिक कारणातून ही घटना घडली असावी , असा पोलिसांचा अंदाज आहे . राहुल राजाराम निलम ( वय ३५ , रा . सिध्दीविनायक पार्क , हरिओम नगर जळगाव ) असे मृत युवकाचे नाव आहे . तो भुसावळ येथील संत गाडगेमहाराज हिंदी हायस्कूलमध्ये । कारकून म्हणून गेल्या दहा वर्षांपासून नोकरीला होता . त्याने बजरंग बोगद्यावरील पुलावरील रुळावर झोपून आत्महत्या केली . त्यानंतर घटनास्थळी गर्दी जमली . राहुलचा भाऊ राकेश नीलम यांनी त्यांचा मृतदेह ओळखून हंबरडा फोडला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *