भुसावळात आक्रोश आंदोलन ; महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यूत कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसिलदार यांना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली आरक्षण हक्क कृती समिती व स्वतंत्र मजदूर युनियनच्या आदेश व निर्देशानुसार आक्रोश आंदोलन करण्यात आले . संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना आक्रोश आंदोलनाच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले .
याअतंर्गत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यूत कर्मचारी संघटनेच्यावतीने जळगाव जिल्यातील भुसावळ येथील
तहसिलदार दिपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले .
निवेदनात नमूद आहे की ,
1) मागासवर्गीयांचे पदोन्नती मधिल 33% आरक्षण रद्द करणारा दि. 07 मे 2021 रोजीचा शासन निर्णय असंविधानीक व बेकायदेशीर असल्याने तात्काळ रद्द करणे.
2) मा.सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित याचिकामधील अंतिम निर्णयाचे अधीन राहून कोट्यातील पदोन्नतीची 33% रिक्त पदे बिंदू नियमावलीनुसार भरण्यात यावे.
प्रसंगी कोविड चे सर्व नियमांचे पालन करून आक्रोश आंदोलनासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन शाखा :भुसावळ औ.वि.केंद्र शाखाअध्यक्ष- मिलिंद खंडारे ,सचिव- अख्तर तडवी , कार्याध्यक्ष रोशन वाघ , प्रमुख सल्लागार एम.एम. पागवाड उपस्थित होते.अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख–म. रा. मा. वि.कर्मचारी संघटन, औ. वि.केंद्र भुसावळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *