आतापर्यंत महाराष्ट्रात ६१० मे.टन पेक्षा जास्त एलएमओ उतरविण्यात (ऑफलोड) आला आहे .

महाराष्ट्रातील ९वी ऑक्सिजन एक्सप्रेस दि. २०.५.२०२१ रोजी संध्याकाळी ५.२५ वाजता बाळे स्थानकात पोहोचली. ऑक्सिजन एक्स्प्रेसने अंगुल येथून ८ टँकरसह ९३.३७ मे.टन एलएमओची सोलापूर विभागातील बाळे स्थानकात वाहतूक केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्यात आठ ऑक्सिजन एक्सप्रेस जसे पहिली विशाखापट्टणम ते नागपूर / नाशिक रोड (७ टँकरमध्ये एलएमओ), दुसरी हापा ते कळंबोली (३ टँकरमध्ये एलएमओ), तिसरी व चौथी अंगुल ते नागपूर (प्रत्येक ट्रेनमध्ये ४ टँकर एलएमओ), पाचवी अंगुल ते लोणी ( ४ टँकर एलएमओ), सहावी, सातवी व आठवी अंगूल ते नागपूर (प्रत्येक ट्रेनमध्ये ४ टँकर एलएमओ)
महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे आतापर्यंत ६१० मेट्रिक टनपेक्षा जास्त एलएमओ उतरविण्यात (ऑफलोड) आला आहे.
सर्व अडथळ्यांवर मात करून नवीन उपाय शोधून भारतीय रेल्वे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यात पोहोचवून दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
आतापर्यंत, भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यात ७७५ हून अधिक टँकरद्वारे सुमारे १२,६३० मे. टन एलएमओ वितरीत केले आहे. येथे आवर्जून नमूद करण्यात येते की, आतापर्यंत सुमारे २०० ऑक्सिजन एक्सप्रेसने आपला प्रवास पूर्ण केला आहे आणि विविध राज्यांना एलएमओ पोहोचवून दिलासा दिला आहे.
देशभर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) पोहोचवून कोविड -१९चा प्रसार रोखण्यासाठी देशाच्या प्रयत्नात रेल्वेचे योगदान कायम आहे.


