ऐन परीक्षा काळात ‘बत्ती गुल’ ; विद्यार्थी परीक्षेपासून वंचित ; विज पुरवठा सुरळीत ठेवावा अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण ते ऑनलाइन परिक्षा असा प्रवास आणि प्रवाह सुरु झाला आहे. सध्या परीक्षांचा हंगाम सुरु असून विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन सुरू आहेत. विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये महावितरणमुळे अनेक अडचणी येत आहेत. भुसावळात एकाच पावसामूळे विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.
विज कंपनीने दीर्घकाळ वीजपुरवठा सुरळीत राहील, अशा प्रकारची कामे तत्काळ करावी अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केली आहे.
पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. विजेच्या लपंडावाने परीक्षा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. महावितरण विभागाने कोणत्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार आहे, याची पूर्वकल्पना दिल्यास वणवण थांबेल. वीज सेवा सुरळीत करण्यात यावी अन्यथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन केले जाईल असा इशारा शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी दिला आहे.

पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे धोकादायक असलेली कामेसुद्धा सुरू करण्यात आलेली नसून वीज गुल होण्याची कारणे विचारली असता नेमकं उत्तर देणे अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. हेल्पलाईन कायम बंद किंवा व्यस्त असते. दोन दिवसात साधारण चार-सहा तास वीजपुरवठा बंद करण्यात आला. कोरोना परिस्थितीमुळे सर्वच परीक्षा ऑनलाइन असल्यामुळे सर्व परीक्षा घरून द्याव्या लागत आहेत. ऐन परीक्षेच्या वेळेसच महावितरण विभागाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची पुरती दमछाक होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित करण्यात येत असल्याने वेळेवर विद्यार्थ्यांची फजिती होत आहे.
त्यातच अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्यास हानी टाळण्याच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात येतो. विज कंपनीने दीर्घकाळ वीजपुरवठा सुरळीत राहील, अशा प्रकारची कामे तत्काळ करावी अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केली आहे.
पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. विजेच्या लपंडावाने परीक्षा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. महावितरण विभागाने कोणत्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार आहे, याची पूर्वकल्पना दिल्यास वणवण थांबेल. वीज सेवा सुरळीत करण्यात यावी .अशी मागणी करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *