भुसावळ येथील स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची व्यवस्था करा – शिशिर जावळे यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत व मृत्यूदर वाढतो आहे. आणि या वाढलेल्या मृत्यू दरामुळे सदर कोरोना मृत रुग्णांवर अंत्य संस्कार करण्यासाठी भुसावळ येथील स्मशानभूमी मध्ये रोजची वेटिंग असते. त्यामुळे एक प्रकारे मृतदेहाची हेळसांड होत आहे. भुसावळ येथील तापीनदी किनाऱ्यावरील स्मशान भूमी मध्ये डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधील कोरोना मृत रुग्णांना सुद्धा येथे अंतिम संस्कारसाठी आणत असल्यामुळे त्या ठिकाणी मृतदेहांची गर्दी होत असल्यामुळे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. भुसावळ स्मशान भूमी मध्ये सदर कोरोना रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात सरपण लाकडे, शेणाच्या गोवर्‍या, या साठी आवश्यक इतर साहित्य मोठ्या प्रमाणात लागत आहे. अंतिम संस्कारासाठी लाकडांची प्रचंड मागणी वाढत आहे. कोरोना मृत रुग्णांच्या मृतदेहावर अंतिम संस्कारासाठी सध्या लागत असलेली प्रतीक्षा टा ळण्यासाठी, तसेच एकीकडे पर्यावरण रक्षण करण्यासाठी व लाकडांचा वापर थांबविण्यासाठी व त्वरित अंतिम संस्कार होउन मृतदेहाची हेळसांड थांबविण्यासाठी व वेळेची बचत होण्यासाठी, भुसावळ नगरपालिकेने तापी नदीच्या किनारी असलेल्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनी ची व्यवस्था केल्यास वेळेची व लाकडांची बचत होईल. या माध्यमातून पर्यावरण रक्षण पण होईल. आणि मृतांवर अंत्यसंस्कार त्वरित होतील. म्हणून भुसावळ येथील तापी नदी किनाऱ्यावरील स्मशानभूमीमध्ये कधी होणारे अंतिम संस्कारासाठी लागणाऱ्या वेळेला टाळण्यासाठी,विद्युत वाहिनी ची व्यवस्था करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी डॉक्टर अभिजित राऊत जिल्हाधिकारी जळगाव तथा श्री संदीप चिद्रवार मुख्याधिकारी भुसावळ नगरपालिका यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *