इनरव्हील क्लब भुसावळ तर्फे महिला दिना निमित्त महिला पोलीसांचा “तेजस्विनी ” पुरस्काराने सन्मान ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
इनरव्हील क्लब भुसावळ तर्फे महिला दिना निमित्त भुसावळ विभागातील महिला पोलीस व महिला ट्रॅफिक पोलीस यांचा “तेजस्विनी ” सम्मान देऊन सत्कार करण्यात आला.
करोना लॉकडाऊन काळात पोलिस विभागासह सर्व महिला पोलीस यांनी त्यांची लहान मुलं व परिवार सोडून आपल्या सुरक्षितेसाठी त्यांचे कर्त्यव्य बजावत होत्या व आजही आहेत
इनरव्हील क्लब नेहमीच अश्या कर्तव्य दक्ष कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत असतो.
सर्टिफिकेट, स्वच्छतेच्या वस्तूंचा एक बुके असे सन्मानाचे स्वरूप होते.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक रामकृष्ण कुंभार , व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या रजनी संजय सावकारे, असोसिएशन सी सी सी सी. डॉ. रश्मी शर्मा होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष क्लब च्या अध्यक्षा शितल भराडे होत्या.
कार्यक्रमाचे प्रायोजक संजय लाहोटी होते.
25 महिला पोलिसांचा सत्कार केला. मनोगत व्यक्त करतांना पोलीस अधिकारी रुपाली चव्हाण म्हणाल्या की अश्या सत्कार सोहळ्याने त्यांना व टीम ला प्रोत्साहन मिळते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लब सेक्रेटरी रुचिका शर्मा यांनी केले. क्लब च्या मनीषा तायडे, राखी भराडे आदि हजर होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *