भुसावळ (प्रतिनिधी )-
केंद्र सरकारनं केलेली पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करणारी आहे, ती मागं घ्यावी. कारण या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे म्हणून केंद्र सरकारला जाग येण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळात काँग्रेसने केलेल्या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यभराचे लक्ष वेधले आहे.गांधी पुतळ्यापासून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचावात्मक नियोजनात गाड्या ढकलून केंद्र सरकारचा निषेध केला. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे त्यावेळेस गंभीर परिस्थिती निर्माण होईल, त्या परिस्थितीचे प्रतिक म्हणून लोटगाडीवर मोटरसायकल व गॅस सिलेंडर ठेवूनकाँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मार्गक्रमण केले. मोदी सरकार मुर्दा बाद, ” सस्ती दारू मेहंगा तेल वारे मोदी तेरा खेल “, “पेट्रोल डिझेलची शंभरी, मोदी साहेबांना मॅन ऑफ द मॅच करी” अश्या घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.भुसावळाचे तहसीलदार दिपक धिवरे यांना निवेदन देतांना सतत होणारी इंधन दरवाढ मध्यमवर्गीय आणि नोकरदारांचा आर्थिक कणा मोडणारी आहे, अशी भावना भुसावळ शहर काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रविंद्र निकम यांनी मांडली.



