यावल –
तालुक्यातील किनगाव गावाजवळ अंक्लेश्वर बु्ऱ्हाणपुर राज्य मार्गावर येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पपई भरून धुळयाहुन रावेरकडे जाणाऱ्या आयशर ट्रक पलटी होवुन झालेल्या भिषण अपघातात १३ मजुरांसह २ बालकांचा दुदैवी मृत्यु झाला असुन , या पार्श्वभुमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी घटनेचे वृत्त कळताच तात्काळ दुपारी २ वाजेच्या सुमारास किनगाव येथे घटनास्थळी भेट देवुन अपघात स्थळाची पाहणी केली ,
दरम्यान यावल येथे पोलीस स्टेशनला भेट देवुन अपघाता संदर्भातील माहिती घेवुन पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंडे व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , विभागीय पोलिस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांना घटने सदर्भातील काही सुचना दिल्या असुन , पत्रकारांशी बोलतांना विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी सांगीतले की या अपघातातील जबाबदार म्हणुन आपण आयशर चालक शेख जहीर शेख बदरूद्दीन राहणार रावेर व पपई व्यापारी अमीन शाह अशपाक शाह राहणार केऱ्हाळा तालुका रावेर या दोघांविरुद्ध सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येवुन ट्रकचालक व व्यापारी या दोघांना अटक करण्यात आली असल्याचे दिघावकर यांनी सांगितले .



