हिंगाणे ता यावल ( वार्ताहर )

येथे नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणूक 2020 21 यामध्ये विजयी उमेदवार श्रीमती रुकसाना फिरोज तडवी यांची हिंगोणे ग्रामपंचायत येथे सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली व उपसरपंचपदी भैरवी भरत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज दिनांक 12 रोजी सकाळी दहा वाजता निवडणुक निर्णय अध्यासी अधिकारी आर एस भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच उपसरपंच निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले त्यात सरपंच पदासाठी रूकसाना फिरोज तडवी तर उपसरपंच पदासाठी भैरवी भरत पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना दुपारी दोन वाजता अध्यासी अधिकारी आर एस भंगाळे यांनी बिनविरोध घोषित केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या निवडी प्रसंगी उपस्थित
राजेंद्र महाजन .राजेंद्र राणे . रविंद्र पाटील .छगन गाजरे . विष्णु महाजन .महेश राणे .गोपाळ गाजरे . ललीत महाजन . रविंद्र न्हावी . किशोर सावळे . संतोष सावळे .भरत नेहेते. मनोज वायकोळे . अरूण कोळी . विजयसिंह पाटील विनोद पाटील उपस्थित होते फैजपुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी पो कॉ देवीदास सुरदास . महेंद्र महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला


