भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळात 13 रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन महिला आघाडीचा महिला मेळावा पंचायत समिती सभागृहात होत आहे. या मेळानंतर जिल्हा कार्यकारीणी तसेच तालुका कार्यकारीणी व शहर कार्यकारिणी वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये कार्य करू इच्छिणार्या पदांसाठी महिलांच्या मुलाखती सुद्धा होणार आहेत. वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये काम करू इच्छिणार्या सर्व महिला युवती व पदाधिकारी यांनी मेळाव्यास उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मेळाव्याला प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाठ, प्रदेश उपाध्यक्षा डॉ.निशा शेंडे, प्रदेश सदस्य शमिभा पाटील तसेच जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे आदींची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यास उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा संघटक अरुण तायडे, जिल्हा आय.टी.प्रमुख सचिन बार्हे आदींनी केले आहे.



