अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरांसाठी निर्मल कोठारींनी केला 51 हजारांचा निधी सुपुर्द ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतभर राम जन्मभूमी निधी व संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. राम मंदिर निर्माणसाठी अनेकांनी पुढाकार घेत स्वतःहून पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे याच अनुषंगाने भुसावळात सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे व दातृत्वाचे धनी असलेले नगरसेवक निर्मल कोठारी उर्फ पिंटू भाऊ यांनी गुरुवारी वैयक्तीकरीत्या 51 हजार रुपये निधीचा धनादेश डॉ.विरेंद्र झांबरे यांच्याकडे सुपूर्द केला.
प्रसंगी ब्रिजेश लाहोटी, सोनू चिप्पड आदी उपस्थित होते.
मंदिरासाठी हातभार लागल्याचे भाग्य : निर्मल कोठारी
अध्यात्मिक विचारांचा आमचा परीवार असून राम मंदिरासाठी मला वैयक्तिकरीत्या निधी देता आला हे माझे सौभाग्य आहे. हिंदू धर्माची अस्मिता जपली जावी यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेतून मी वैयक्तिक 51 हजारांचा निधी धनादेशाद्वारे गुरुवारी सुपूर्द केल्याचे साईभक्त नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *