भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळात कोट्यावधीचा निधी दिल्यावर सुद्धा विकासकामे होत नाही, जनतेने धुळ खाण्याकरीता यांचे हाती सत्ता दिली नाही, ९० कोटींची अमृत योजना २१४ कोटींची झाली हे पाप सत्ताधाऱ्यांना फेडावेच लागेल, माल मिळणाऱ्या कामांमध्येच फक्त यांना रस उरलाय म्हणून विकासकांमात खोळंबा आणणाऱ्या शुक्राचार्याचे पितळ लवकरच उघडे पाडणार असा खणखणित इशारा शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जुना सातारा विभागात दीपक धांडे यांचे शिवसेना विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतांना दिला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहर व तालुक्यातील जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
भुसावळात शिवसेनेचे गत वैभव मिळवून देण्यास वचनबद्ध आहे, यासाठी एकजुटिने व लढा दया शिवसैनिकांनी कणखरपणे सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामांना विरोध करा, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणू, नागरिकांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत यांना सत्ता दिली पण सत्तेचा उपयोग यांनी फक्त
अर्थकारणासाठी केला. १० दिवसात कामे सुरू करण्याचा अल्टीमेटम ना . पाटील यांनी यावेळेस दिला.तसेच आज दोन ठिकाणी शिवसेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले . केवळ कार्यालय उघडून चालणार नाही यासाठी जनतेच्या समस्या सोडवन्याचा प्रयत्न करा या शहराने पूर्वी 2 वेळेस शिवसेनेचे आमदार दिले आहे . आता सुद्धा मागचे गत वैभव पुढे आणून दाखवायचे आहे जेष्ठ शिवसैनिकांचे व जनतेच्या आशीर्वादाने हे शक्य आहे उठ व लढ म्हणून शिवसैनिकानी जागे होऊन ताक़दीने मैदानात उतरायचे आहे आपल्या सर्वाकरीता सरकार सदैव तुमच्या पाठिशी आहे भुसावळात पुन्हा शिवसेनेची सत्ता आणा, मोर्चे बाँधनीसह शाखा उघड़ा मेहनत करा, असे आवाहन तमाम शिवसैनिक व शिवसेना प्रेमी जनतेला ना पाटिल यांनी केले .
यावेळी व्यासपीठावर आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख ऍड. जगदीश कापडे, माजी नगराध्यक्ष नीळकंठ फालक, उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपजिल्हा प्रमुख ऍड. श्याम गोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, निलेश महाजन,माजी नगरसेविका सौ शारदा दीपक धांडे, महिला आघाडी जिल्हासंघटिका सौ. पुनम बऱ्हाटे, तालुका संघटिका सौ. भुराबाई चव्हाण, जिप सदस्य सौ.सरलाकोळी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, रेल कामगार सेना मंडल अध्यक्ष ललित मुथा, शिक्षकसेना जिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड,उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, उपतालुका प्रमुख समाधान पाटील, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, युवासेना जिल्हा युवाअधिकारी ऍड. चंद्रकांत शर्मा , तालुका युवाअधिकारी हेमंत बऱ्हाटे, शहर युवाअधिकारी सुरज पाटील, शहर संघटक योगेश बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख मनोज पवार, उपशहर प्रमुख स्वप्नील सावळे, उपशहर प्रमुख राकेश खरारे, माजी नगरसेवक ऍड. नरेंद्र लोखंडे, विभाग प्रमुख अमोल पाटील, ऍड. निर्मल दायमा, शाखा प्रमुख पिंटू भोई, माजी शहर युवाअधिकारी सागर वाघोदे, प्रसिध्दी प्रमुख गोकुळ बाविस्कर, अल्प संख्यांक आघाडी तालुका संघटक अबरार खान, शहर संघटक शेख मेहमुद, माजी नगरसेवक अनिल भोळे, कैलास लोखंडे, सदाशिव पाटील, शांताराम इंगळे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेवक संजीव कोलते, वरणगाव शहर प्रमुख रवी सुतार, हेमंत खंबायत, नमा शर्मा व शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
प्रसंगी भुसावळातील हद्द वाढ, गुन्हेगारीचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न सोडवावे तसेच जेष्ठ नागरिकांना लाभार्थीं म्हणून असलेली वयोमर्यादा कमी करावी अशी मागणी प्रास्ताविकातून दीपक धांडे यांनी केली. जळगावहुन येणाऱ्या भुसावळातील वाय पॉईंटला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी आयोजकांनी केली.
खान्देशातून शिवसेनेचा पहिला आमदार भुसावळाचाच होता, संघटना म्हणूनच शिवसेनेच कामं जोमाने करा, शिवसेनेचा भगवा भुसावळ नगरपालिकेवर फडकण्याच्या दृष्टीने आतापासूनच जोरदार तयारीला लागा,’ करोनाच्या संकटाच्या काळातही मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आपले काम चोख पार पाडले. अशावेळी तुम्ही सर्व जण सरकारने केलेली कामे घेऊन पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, पुढचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच असेल असे आवाहन माजी जिल्हा प्रमुख जगदीश कापडे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

माजी नगरसेवक दीपक धांडे, शारदा धांडे, ऍड. नरेंद्र लोखंडे, हेमंत चौधरी, राकेश खरारे, सागर वाघोदे, अमोल पाटील, स्वप्नील सावळे, गोकूळ बाविस्कर, पिंटू भोई, चेतन भोई, किरण बढे व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


