भुसावळातील खडका चौफुलीवरील उड्डाणपुलास माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे – मुस्लीम समाज मंचची मागणी ; प्रांताना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहराला लागून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून खडका चौफुलीवरील उड्डाणपुलालामाजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, अशी मागणी मुस्लीम समाज मंचच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी भुसावळ प्रांताधिकारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. हा परीसर मुस्लीम बहुज रहिवासी असून माजी राष्ट्रपतींचे नाव या उड्डाणपुलाला दिल्यास त्यांच्या नावाचे सातत्याने उच्चारण होवून अन्य नागरीकांनाही प्रोत्साहन मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे
निवेदन देताना नगरसेवक शेख सलीम शेख नादर, माजी नगरसेवक साबीर शेख, सिकंदर खान ईस्माईल खान, मो.मुन्वर खान, डॉ.एजाज अहमद खान आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *