मध्य रेल्वे द्वारा सणाच्या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस -नागपुर आणि हडपसर -नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्यांचे संचालन तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया विशेष गाडीचा विस्तार

भुसावळ (प्रतिनिधी)-
मध्य रेल्वे द्वारा आगामी पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस -नागपुर आणि हडपसर -नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्यांचे संचालन करण्यात येणार आहे तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया विशेष गाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय तसेच अतिरिक्त प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

1) लोकमान्य टिळक टर्मिनस -नागपुर विशेष गाडी (८ फेरी)
01089 विशेष दिनांक ०५.११.२०२६ ते १५.११.२०२६ या कालावधीत गुरुवार आणि रविवार रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २१:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे १२:१० वाजता पोहचेल. (४ फेरी)
01090 विशेष दिनांक ०६.११.२०२६ ते १६.११.२०२६ या कालावधीत शुक्रवार आणि सोमवार रोजी नागपूर येथून १६:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०५;५० वाजता पोहचेल. (४ फेरी)
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
डब्यांची रचना : १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ९ शयनयान श्रेणी, ४ सामान्य द्वितीय श्रेणी ,१ सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

2) हडपसर -नागपूर विशेष गाडी (४ फेरी)
01443 विशेष दिनांक ०७.११.२०२६ आणि १४.११.२०२६ रोजी हडपसर येथून १६:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे ०६:३० वाजता पोहचेल. (२ फेरी)
01444 विशेष दिनांक ०८.११.२०२६ आणि १५.११.२०२६ रोजी नागपूर येथून १९:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हडपसर येथे ११:०५ वाजता पोहचेल. (२ फेरी)
थांबे : उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
डब्यांची रचना : २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान श्रेणी, ४ सामान्य द्वितीय श्रेणी ,१ सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

3) लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया विशेष गाडीचा विस्तार 
08610 लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया विशेष पूर्वी अधिसूचित  दि. २७.१०.२०२६ पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता दि. ०१.१२.२०२६ पर्यंत करण्यात आला आहे.
08609 हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष पूर्वी अधिसूचित  दि. २६.१०.२०२६ पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता दि. ३०.११.२०२६ पर्यंत करण्यात आला आहे.

आरक्षण -: विशेष गाडी क्रमांक 01089, 01090, 01443, 01444 आणि 08610 साठी आरक्षण दिनांक 01.11.2026 पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू होईल.
प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा देखील वापर करू शकतात.
या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळेसाठी NTES / भारतीय रेल्वे चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.