आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीची बुधवार, २३ सप्टेंबर रोजी भुसावळात महत्त्वाची बैठक*

भुसावळ(प्रतिनिधी)-
आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात, अनुसूचित जातीची एकता टिकवण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या व भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी तसेच अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचे हित जपण्यासाठी *जळगाव येथे 'जन आक्रोश महामोर्चा' चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी* व रावेर लोकसभा मतदारसंघातील नियोजनासाठी *बुधवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता एस सी एस टी कार्यालय DRM ऑफिस जवळ भुसावळ* येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस *रावेर लोकसभा मतदारसंघातील ५९ जातींमधील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि संविधानवादी कार्यकर्त्यांनी* मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन 'आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव' च्या वतीने करण्यात आले आहे.
*जळगाव येथे रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक* येथे हा ऐतिहासिक जन आक्रोश महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चात रावेर लोकसभा क्षेत्रातून सर्व ५९ जातींचे हजारो नागरिक सहभागी होणार असून, त्याच्या रूपरेषेबाबत २३ सप्टेंबरच्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे.
तसेच अनुसूचित जातीच्या अंतर्गत येणाऱ्या *सर्व ५९ जाती-समूहांनी व संविधानप्रेमी नागरिकांनी* आपल्या हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
*आयोजक:-आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव*