नाहाटा महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त प्राध्यापकांचा गुणगौरव संपन्न

 भुसावळ (प्रतिनिधी ) - येथील नाहाटा महाविद्यालयामध्ये दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी स्टाफ अकॅडमी आणि स्टाफ अँड स्टूडेंट्स वेल्फेअर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने  शिक्षक दिन व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुण गौरव समारंभ पार पडला .
 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा डॉ. मोहन भाऊ फालक, चेअरमन श्री महेश भाऊ फालक, कोषाध्यक्ष मा श्री संजयकुमारजी  नाहाटा, प्राचार्य डॉ बी एच बऱ्हाटे , उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील, उपप्राचार्य डॉ. जी आर वाणी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम.पाटील  इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .
 याप्रसंगी महाविद्यालयातील मागील वर्षात पीएच.डी, नेट - सेट, पेटंट व आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील जर्नल मध्ये प्रकाशित शोधनिबंध प्राप्त  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संचालक मंडळातर्फे  सत्कार करण्यात आला.
 दिनांक 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. रश्मी शर्मा यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनावर आणि आजच्या आधुनिक युगात शिक्षण क्षेत्रात होणारे बदल यावर सखोल असे मार्गदर्शन केले तसेच त्यांनी काव्याच्या माध्यमातून शिक्षक कसा असावा यावर भाष्य केले.
 अध्यक्षीय मनोगतात डॉ.मोहन भाऊ फालक यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच डिजिटल युगात शिक्षकांची जबाबदारी कशी महत्त्वाची आहे याबाबत आपले विचार मांडले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ अकॅडमी समिती प्रमुख प्रा. डॉ. एस.टी. धूम यांनी केले. सूत्रसंचालन पी.ए. अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी केले. गुणगौरव यादी वाचन डॉ मनोज कुमार जाधव, डॉ.ममता पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रबंधक श्री. भगवान तायडे व कार्यालयीन अधीक्षक श्री. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  स्टाफ अकॅडमी  आणि स्टाफ अँड स्टूडेंट वेल्फेअर समितीच्या डॉ एस. के राठोड, डॉ. सचिन येवले, डॉ. गौरी पाटील, डॉ. जितेंद्र आडोकार, प्रा.सुनील अडकमोल, डॉ.किरण वारके इ.सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी बहुसंख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.