भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून साईनगर शिर्डी ते सिकंदराबाद एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७००१/१७००२) मध्ये एक अतिरिक्त वातानुकूलित-तृतीय श्रेणीचा (AC-III) कोच कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे: गाडी क्रमांक १७००१/१७००२ साईनगर शिर्डी ते सिकंदराबाद एक्सप्रेस * साई नगर शिर्डी येथून प्रवास सुरु दि.०५.०९.२०२६ पासून * सिकंदराबाद येथून प्रवास सुरु दि. ०४.०९.२०२६ पासून सदर गाडीची सुधारित संरचना खालीलप्रमाणे राहील: २ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ६ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. एकूण गाडीच्या संरचनेत आता २० डब्बे असतील, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल. रेल्वे प्रशासन प्रवाशांना विनंती करते की, त्यांनी या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासावी.


