भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वे क्षेत्रात सुरू असलेल्या संरचनात्मक बदलांमुळे आणि वाढत्या खासगीकरणामुळे देशभरातील कुलींच्या रोजगारावर गदा येत असल्याची तीव्र चिंता व्यक्त करत राष्ट्रीय कुली मोर्चाने रेल्वे प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या आहेत. कुलींच्या रोजगाराची हमी निश्चित करण्याबरोबरच रेल्वे स्थानकांवरीलया अहवालासाठी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

बॅटरी रिक्षा, ट्रॉली सेवा आणि ‘माय कुली’ अॅपचे संचालन खासगी कंपन्यांऐवजी कुली सहकारी संस्थांकडे सोपविण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. बैठकीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कुलींना रेल्वे सेवेत सामावून घेण्याची तसेच त्यांच्या सामाजिक सुरक्षेसंदर्भात रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.


