डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रकाश सरदार यांची निवड:

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे त्रिरत्न बुद्ध विहारात ग्रामस्थांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत सर्वानुमते प्रकाश सरदार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी तरुण गवई व सुरज पवार यांची निवड झाली. सचिवपदी दीपक सुरवाडे व आशिष सुरवाडे, सहसचिवपदी राहुल तायडे, कोषाध्यक्षपदी अजय वाघ तर सहकोषाध्यक्षपदी प्रणव मेश्राम यांची निवड करण्यात आली.

संघटक म्हणून अरुण भालेराव, सहसंघटक म्हणून उल्हास मोरे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून रमेश खंडारे यांची निवड झाली. सदस्यपदी विशाल जोहरे, मिलिंद गाढे, सागर नाईक, आनंद सुरडकर, गौरव नरवाडे, सुमेध कांबळे, सुरेश बोदडे, मधूकर चतुर, यश अवचार, संघपाल सोनवणे, चेतन तांबे, चिकू मेश्राम यांची निवड करण्यात आली.

सल्लागार म्हणून एन. टी. इंगळे, अरुण दामोदर, राहुल वाघ, मधूकर हातोले, मधूकर बाऱ्हे, बिट्टू बाऱ्हे, रमेश शिरसाठ, चक्रधर यावलकर यांची निवड झाली. ग्राम शाखा महिला अध्यक्ष म्हणून उषा सुरवाडे यांची निवड करण्यात आली. तसेच प्रद्मा खंडारे, करुणा नरवाडे, वैशाली सरदार, चंदा खंडारे, वैशाली जाधव, मंगला सुरवाडे यांच्यासह अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी समितीमार्फत जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.