अशोक कोतवाल यांनामहाराष्ट्र शासनाचा “बालकवी” राज्य पुरस्कार

जळगाव : ये‌थील ज्येष्ठ साहित्यीक अशोक कोतवाल यांना त्यांच्या ” गाऊ आनंदाचे गाणे ” या बाल कवितासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा”बालकवी” पुरस्कार जाहीर झालेला आहे.सदर पुरस्काराचे स्वरुप रोख रुपये पन्नास हजार,सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे..हा कवितासंग्रह अष्टगंध प्रकाशन,ठाणे या प्रकाशन संस्थेनं प्रकाशीत केलेला आहे. लवकरच शासनाच्या विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सदर पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.अशोक कोतवाल यांचे आतापर्यंत चार कवितासंग्रह, तीन ललित लेखसंग्रह,दोन बालकविता संग्रह आणि एक संपादित ग्रंथ प्रकाशीत झालेले आहेत.त्यांना त्यांच्या या लेखनासाठी महाराष्र्ट शासनाच्या तीन राज्य पुरस्कारांसह मराठी साहित्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या अठरा पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.तसेच शालेय स्तरापासून तर महाविद्यालयालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश आहे