साकेगाव प्रीमियरली योद्धा संघाने पटकाविला !अंतिम सामन्यात मातृभूमी संघाला ४० धावांनी नमविले

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहराजवळील साकेगाव जि प शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सीसी आयोजित एस पी एल सीजन-२ या स्पर्धेत अंतिम सामन्यात योद्धा संघाने मातृभूमी संघाला ४० धावांनी नमवत साकेगाव प्रीमियर लीग स्पर्धेवर आपले नाव कोरले.स्पर्धेचा पाहण्यासाठी साकेगावकरांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.हे या स्पर्धेचे आकर्षण होय.

प्रथम फलंदाजी करताना योद्धा संघाने निर्धारित आठ षटकात तब्बल ८८धावा काढल्या यात युद्धाच्या सागर सोनवणे याने ३९ धावा काढत मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकाविला. दरम्यान मातृभूमी संघाला ८८ धावाचा पाठलाग करताना फक्त ४० धावापर्यंत मजल मारता आली. अंतिम सामना योद्धा संघाने ४८ धावांनी जिंकत चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून मातृभूमी संघाच्या मयूर पाटील याला सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून योद्धा संघाच्या साहिल पटेल ला सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या एम्पायर मल्हार संघाच्या पवन भागवत ला मॅन ऑफ द सिरीज देण्यात आली.

बक्षिसांचा वर्षाव ..

स्पर्धेत प्रथम संघाला २१ हजार व द्वितीय संघाला ११ हजार असे बक्षीस जाहीर करण्यात आले होते मात्र अंतिम सामन्याच्या दिवशी प्रेक्षकांकडून अंतिम सामन्याकरिता अक्षरशः बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला .स्पर्धेतील प्रत्येक चौकार षटकार विकेट घेणाऱ्याला पाचशे ते हजार पर्यंत बक्षीस देण्यात आले तर अंतिम सामना जिंकणाऱ्या व विजेता व उपविजेता संघाला निर्धारित रकमेपेक्षा तब्बल १५ ते २० हजार जास्त बक्षीस प्रेक्षकांकडून मिळाले गावातील राजकीय पुढारी, प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक यांनी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंवर पहिल्या सामन्यापासून तर थेट शेवटच्या सामनापर्यंत बक्षीसाचा वर्षाव केला

प्रेक्षकांची प्रचंड गर्दी व जल्लोष

थेट प्रक्षेपण असलेल्या या स्पर्धेचा आनंद देशासह परदेशात असलेल्या साकेगाव व परिसरातील नागरिकांनी घेतला याशिवाय मैदानाच्या चारी कोपऱ्यावर मोठ्या प्रचंड प्रमाणात क्रिकेट रसिकांची गर्दी होती काही वेळ तर महामार्गावर सामने पाहण्यासाठी वाहनाची रांगा सुद्धा लागल्या होत्या साकेगावकरांसाठी स्पर्धा उत्सव स्वरूपात साजरी केली जाते. स्पर्धेकरिता कामानिमित्त व नोकरीनिमित्त मोठ्या शहरात गेलेले तरुण वर्ग सामन्याचा आनंद घेता यावा याकरिता गावात दाखल झाले होते तर अनेकांनी स्पर्धेत भाग सुद्धा नोंदविला होता.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव तसेच आयोजन समितीचे सदस्य वासेफ पटेल राहुल चौधरी, डॉ. दीपक पाटील, डॉ. कैलास ठाकरे, रमजान पटेल, राहुल साळुंखे, पप्पू पटेल, भूषण सिंग राजपूत, प्रवीण पाटील, हेमंत वाघ, सचिन सोनवणे, मोहित दामोदर, निलेश कोळी, नितीन पाटील, अजय चौधरी यांच्यासह विविध संघातील खेळाडूंनी सुद्धा परिश्रम घेतले

उपविजेता मातृभूमि संघ.