कसारा येथील १२ दिवसांच्या ब्लॉकबाबत अद्ययावत माहिती –दिनांक १४ ते दिनांक १६ ऑक्टोबर या कालावधीतील उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांवरील परिणाम

आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईनचा विस्तार (इगतपुरी बाजू) या कामांच्या अनुषंगाने, मध्य रेल्वेद्वारे कसारा येथे दिनांक ७.१०.२०२६ ते दिनांक १८.१०.२०२६ या कालावधीत १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे.

आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेचे हे काम, कसारा आणि कल्याण दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचाच एक भाग आहे. यामुळे मेल/एक्सप्रेस आणि उपनगरीय रेल्वे सेवांची वाहतूक स्वतंत्र करणे शक्य होईल आणि मार्गिकेची क्षमता भविष्यात वाढवण्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण होईल. तसेच, यामुळे कामकाजातील लवचिकता वाढेल, गाड्यांच्या हालचालींचे नियमन अधिक सुलभ होईल आणि अतिरिक्त गाड्यांची सेवा हाताळण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.

या मोठ्या प्रकल्पाचे अंतिम फायदे मिळवण्याच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
या कामाचे पूर्ण परीचालनाचे फायदे संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि कार्यान्वित झाल्यानंतरच मिळतील. 

*दिनांक १४.१०.२०२६ ते दिनांक १६.१०.२०२६ या कालावधीतील रेल्वे सेवेवरील परिणामांचा तपशील*

*ब्लॉकच्या तारखा:*
दिनांक १४.१०.२०२६ (बुधवार) ते दिनांक १६.१०.२०२६ (शुक्रवार)
*ब्लॉकचा कालावधी:*
दिनांक १४.१०.२०२६ (बुधवार) रोजी १५.३५ ते २०.३५ वाजेपर्यंत,
दिनांक १५.१०.२०२६ (गुरुवार) रोजी १५.३५ ते १९.३५ वाजेपर्यंत,
दिनांक १६.१०.२०२६ (गुरुवार-शुक्रवार मध्यरात्र) रोजी ०३.०० ते ०६.०० वाजेपर्यंत आणि
दिनांक १६.१०.२०२६ (शुक्रवार) रोजी १५.३५ ते १९.३५ वाजेपर्यंत.

*ब्लॉकचा विभाग:*
कसारा - खर्डी आणि उंबरमाळी - कसारा दरम्यानची 'अप' मेन लाईन; यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १, ३, ४ आणि 'अप' यार्डचा समावेश आहे.

*(अ) उपनगरीय सेवा - रेल्वे वाहतुकीवर होणारे परिणाम-*
ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

*ब्लॉक कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांचे परिचालन*

*दिनांक १४.१०.२०२६ ते दिनांक १६.१०.२०२६ दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवांचे  शॉर्ट टर्मिनेशन/ ओरीजनेशन*
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.१०, १४.१७, १४.४६ आणि १६.५० वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा उपनगरीय रेल्वे सेवा आसनगाव स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
कसारा येथून १५.३५, १६.१६, १७.०२ आणि १८.१७ वाजता सुटणाऱ्या कसारा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  उपनगरीय रेल्वे सेवा अनुक्रमे १६.१२, १६.५४, १७.३९ आणि १८.५४ वाजता आसनगाव स्थानकावरून सुटतील.


*दिनांक १४.१०.२०२६ ते दिनांक १६.१०.२०२६ या कालावधीतील शेवटच्या आणि पहिल्या उपनगरीय रेल्वे सेवा*
'डाऊन नॉर्थ ईस्ट' मार्गावर कसारा येथे जाणाऱ्या ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरीय रेल्वे सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.३० वाजता सुटेल.
'अप नॉर्थ ईस्ट' मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरीय रेल्वे सेवा कसारा येथून १४.४२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर 'डाऊन नॉर्थ ईस्ट' मार्गावर कसारा येथे जाणारी पहिली उपनगरीय रेल्वे सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १८.२८ वाजता सुटेल.
ब्लॉकनंतर 'अप नॉर्थ ईस्ट' मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली उपनगरीय रेल्वे सेवा कसारा येथून २०.१५ वाजता सुटेल. 

*(ब ) रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम - मेल आणि एक्सप्रेस गाड्या*
गाड्यांचे रद्दीकरण 
गाडी क्रमांक 12262 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरंतो एक्स्प्रेस (प्रवास सुरु होण्याची दिनांक १३.१०.२०२६) आणि 
गाडी क्रमांक 12261 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा दुरंतो एक्स्प्रेस (प्रवास सुरु होण्याची दिनांक १४.१०.२०२६) रद्द राहतील.
 
*दिनांक १४.१०.२०२६ रोजी प्रवास सुरू होणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल*
दिनांक १४.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11081 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपुर एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.३५ ऐवजी १७.५० वाजता सुटेल,
दिनांक १४.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 12107 लोकमान्य टिळक टर्मिनस - सीतापुर एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.२५ ऐवजी १७.३५ वाजता सुटेल,
दिनांक १४.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 13380 लोकमान्य टिळक टर्मिनस - धनबाद एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.५५ ऐवजी १८.०५ वाजता सुटेल.

*दिनांक १५.१०.२०२६ रोजी प्रवास सुरू होणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल*
दिनांक १५.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11079 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपुर एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५.४५ ऐवजी १७.३५ वाजता सुटेल,
दिनांक १५.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 12153 लोकमान्य टिळक टर्मिनस - रानी कमलापति एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.२५ ऐवजी १७.५० वाजता सुटेल,
दिनांक १५.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 22584 लोकमान्य टिळक टर्मिनस - छपरा एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.३५ ऐवजी १८.०५ वाजता सुटेल,
दिनांक १५.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 12261 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -हावडा दुरंतो एक्सप्रेस आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक १५.१०.२०२६ रोजीच्या १७.१५ ऐवजी दिनांक १६.१०.२०२६ रोजीच्या ००.२० वाजता (म्हणजेच दिनांक १५/१६.१०.२०२६ च्या मध्यरात्री) सुटेल.


*दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक १५.१०.२०२६ रोजीच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल*
दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक १५.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस - बलिया कामायनी एक्सप्रेस दोन्ही दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३.५० ऐवजी १७.०५ वाजता सुटेल.
दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक १५.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस - राजगीर एक्सप्रेस दोन्ही दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १४.४५ ऐवजी १७.२० वाजता सुटेल. 
दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक १५.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 22221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता ही गाडी दोन्ही दिवशी १६.०० ऐवजी १७.१५ वाजता सुटेल.

कल्याण - कर्जत - पुणे - मनमाड मार्गे वळवण्यात येणाऱ्या गाड्या 
गाडी क्रमांक 12598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गोरखपुर अंत्योदय एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.१०.२०२६)
गाडी क्रमांक 11043 दादर - बलिया एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.१०.२०२६)
गाडी क्रमांक 12188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - जबलपुर गरीब रथ एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.१०.२०२६) 
गाडी क्रमांक 11047 दादर - गोरखपुर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.१०.२०२६) 
गाडी क्रमांक 12139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस  (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक १५.१०.२०२६).

गाड्यांचे नियमन
'अप' दिशेच्या गाड्या
गाडी क्रमांक 12166 गोरखपुर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस: ​​दिनांक १४.१०.२०२६ रोजी इगतपुरी येथे १८.१० ते १९.१५ या वेळेत, 
गाडी क्रमांक 12172 हरिद्वार - लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकुलीत एक्सप्रेस: ​​दिनांक १४.१०.२०२६ रोजी भुसावळ विभागात १० मिनिटांसाठी, 
गाडी क्रमांक 22130 अयोध्या कैंट - लोकमान्य टिळक टर्मिनस तुलसी एक्सप्रेस: दिनांक ​​१५.१०.२०२६ रोजी इगतपुरी येथे १८.१५ ते १९.२५ या वेळेत, 
गाडी क्रमांक 14121 सूबेदारगंज - लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस: ​​दिनांक १६.१०.२०२६ रोजी इगतपुरी येथे १८.१० ते १९.१५ या वेळेत, 
गाडी क्रमांक 12533 गोमती नगर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुष्पक एक्सप्रेस: ​​दिनांक १४.१०.२०२६, दिनांक  १५.१०.२०२६ आणि दिनांक १६.१०.२०२६ रोजी इगतपुरी येथे १८.३० ते १९.२५ या वेळेत, 
गाडी क्रमांक 12860 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस: ​​दिनांक १४.१०.२०२६, दिनांक  १५.१०.२०२६ आणि दिनांक १६.१०.२०२६ रोजी भुसावळ विभागात १ तासासाठी.

'डाऊन' दिशेच्या गाड्या:
गाडी क्रमांक 15066 पनवेल - गोरखपुर एक्सप्रेस: दिनांक ​​१४.१०.२०२६ रोजी खर्डी येथे १७.४४ ते १९.३५ या वेळेत.
गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस - नांदेड एक्सप्रेस: दिनांक ​​१५.१०.२०२६ रोजी आटगाव येथे १८.५६ ते १९.३५ या वेळेत.
गाडी क्रमांक 11001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस: ​​दिनांक १४.१०.२०२६ रोजी आटगाव येथे १८.१८ ते १९.३५ या वेळेत आणि दिनांक १५.१०.२०२६ रोजी खर्डी येथे १८.२६ ते १९.३५ या वेळेत. 

गाड्यांचे नियमन आणि एकापाठोपाठ एक गाड्या येण्यामुळे, दिनांक १४.१०.२०२६ ते दिनांक १६.१०.२०२६ या कालावधीत *खालील गाड्या १५ ते २५ मिनिटे उशिराने* चालवण्यात येतील:
गाडी क्रमांक 12108 सीतापुर - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस (दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक १६.१०.२०२६ रोजी)
गाडी क्रमांक 11058 अमृतसर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (केवळ दिनांक १५.१०.२०२६ रोजी)
गाडी क्रमांक 17618 नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तपोवन एक्सप्रेस (तिन्ही दिवशी)
गाडी क्रमांक 22224 साईनगर शिर्डी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस (तिन्ही दिवशी)
गाडी क्रमांक 11072 बलिया - लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस (दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक  १५.१०.२०२६ रोजी), 
गाडी क्रमांक 12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मनमाड पंचवटी एक्सप्रेस (दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक  १५.१०.२०२६ रोजी)
गाडी क्रमांक 17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नांदेड राज्यराणी एक्सप्रेस (दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक १५.१०.२०२६ रोजी), 
गाडी क्रमांक 12105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस (दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक  १५.१०.२०२६ रोजी)
गाडी क्रमांक 12137 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - फिरोजपुर पंजाब मेल (दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक १५.१०.२०२६ रोजी)
गाडी क्रमांक 12151 लोकमान्य टिळक टर्मिनस - शालीमार सुपरफास्ट एक्सप्रेस (दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक  १५.१०.२०२६ रोजी), 
गाडी क्रमांक 12289 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर दुरंतो एक्सप्रेस (दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक  १५.१०.२०२६)
गाडी क्रमांक 12111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - अमरावती एक्सप्रेस  (दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक  १५.१०.२०२६)

दिनांक १७/१८.१०.२०२६ रोजीच्या ब्लॉकचा तपशील योग्य वेळी कळविला जाईल.

पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन  दिलगिर आहे. 
--- --- ---
दिनांक: १२ ऑक्टोबर २०२६

प्र. प. क्रमांक:२०२६/१०/१९
सदर प्रसिद्धीपत्रक डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे.