यावल - माजी खासदार तथा आमदार लोकप्रिय कृषी मित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवार दि.१६ रोजी यावल शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी आदिवासी परिसरात प्रत्यक्ष जाऊन गरजू ,गरिब आदिवासी बांधवांना अन्नदान करण्यात येऊन आदरांजली वाहिली. लोकनेते कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथी निमित्त आदिवासी वस्तीत अन्नदान करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेविका सौ.शुभांगी येवले,अतुल चौधरी,जि.तु.कोळी,व्यंकटेश बारी,रोशन येवले,मुकेश कोळी,बबलू घारू,डॉ.युवराज चौधरी, विजय कासार,पिंटू फेगडे,शंकर भोई,सुधाकर धनगर इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.



