भुसावळ ( प्रतिनिधी) –
येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये दि. ३१ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले, कर्नल अभय मुखर्जी, लेफ्टनंट कर्नल संदीप सिंग तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व मॉडेल श्रद्धा मांगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ. संगीता बियाणी यांच्यासह विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, मनीष बियाणी, राजीव पारिख, प्रवीण भराडीया, गोपाल ठाकूर, शाळेचे प्राचार्य डी. एम. पाटील, रुद्रसेन गंठीया व विविध संस्थांचे प्राचार्य यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट पथसंचलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व क्रीडा ज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. हॉर्स रायडिंग, मोटर बाईक पिरॅमिड, मुलींनी सादर केलेले ‘प्रोग्रेसिव्ह इंडिया’ समूह नृत्य, सामाजिक न्यायव्यवस्थेवर आधारित हृदयस्पर्शी मराठी नाटिका, तसेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ला व भारतीय सैनिकांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित युद्ध देखावा विशेष आकर्षण ठरला. यासोबतच मार्शल आर्ट्स, देशभक्तीपर नृत्य, भारतीयम, योगा व सामूहिक नृत्य सादर करण्यात आले.

( फोटो ओळ – वार्षिक स्नेहसंमेलनात उद्घाटन प्रसंगी मशाल ज्योत पेटवल्यावर उपस्थित पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले सोबत कर्नल अभय मुखर्जी,लेफ्टनंट कर्नल संदीप सिंग,मनोज बियाणी,डॉ.संगीता बियाणी,विनोद बियाणी,स्मिता बियाणी,रोनक बियाणी,आयुषी बियाणी,मनीष बियाणी,प्रिंसिपल डि एम पाटील,रुद्रसेन गंठीया,राजीव पारीख,प्रविन भराडीया व विद्यार्थी.)………….
कर्नल अभय मुखर्जी व केदार बारबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या शिस्तीचे व कलागुणांचे कौतुक केले. या कार्यक्रमात शाळेच्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचलन पर्यवेक्षक रवींद्र तायडे व हिना पटेल यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य डी. एम. पाटील यांनी केले. ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो ओळ – भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी चित्त थरारक मल्लखांब पिरॅमीड सादर करताना विद्यार्थीनी.
भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी मोटरसायकल पिरॅमिडचा चित्त थरारक दृश्य सादर करताना विद्यार्थी.



