उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली सभा

भुसावळ (प्रतिनिधी ) –

येथील माळी भवनात आज शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता लोकनेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, आजी माजी जि.प. व प.स.सदस्य, सरपंच, माजी सरपंच, पदाधिकारी, समाजसेवी संघटना, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, क्रीडा संघटना, वकील संघटना, डॉक्टर संघटना, व्यापारी मंडळ यासह सर्वच स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुसावळ शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.