स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त, दोन आरोपी ताब्यात


जळगाव ( प्रतिनिधी ) –
स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडाकेबाज कारवाई करत चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या असून या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
जामनेर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन मोटारसायकली तसेच भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गुन्ह्यातील एक मोटारसायकल असा एकूण तीन दुचाकींचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे
अनुराग लक्ष्मण सूनगत (वय 19), रा. वाकी रोड, हरी ओम नगर, जामनेर
दर्शन बाप्पू चव्हाण (वय 18), रा. संत सेवालाल नगर, जामनेर
अशी आहेत.
आरोपींकडून चौकशी करण्यात असता त्यांनी त्यांच्या एका साथीदाराच्या मदतीने वरील तीनही मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींचे गुन्हा तपशील पुढीलप्रमाणे –
जामनेर पोलीस स्टेशन:
गुन्हा रजिस्टर नं. 18/2026, BNS 303(2)
गुन्हा रजिस्टर नं. 38/2026, BNS 303(2)
भुसावळ शहर पोलीस स्टेशन:
गुन्हा रजिस्टर नं. 177/2024, BNS 303(2)
आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे, पो. हे. कॉ. गोपाल गव्हाडे, उमाकांत पाटील, पो. ना. विकास सातदिवे, पो. कॉ. प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांच्या पथकाने केली.