पळासखेड येथे नारीशक्ती दिन व हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी ) – बोदवड तालुक्यातील पळासखेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी देवगिरी कल्याण आश्रम, किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व व्हॉईस ऑफ मिडिया महिला विंग यांच्या संयुक्त विद्यमाने नारीशक्ती दिन व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात ॲड. जयश्रीताई देशमुख यांच्या सुमधुर गीताने करण्यात आली. यानंतर राणी माँ गाईदिन्ल्यु यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य मंदाताई चव्हाण, सरलाताई पाटील व पोलीस पाटील उत्कर्षा पाटील यांच्या हस्ते करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी ॲड. जास्वंदी भंडारी यांनी राणी माँ गाईदिन्ल्यु यांच्या कार्याची माहिती देत संघटनेच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला असून उपस्थित महिलांना ब्लाउज पीस व वाण वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात आशा वर्कर वैशाली सुरवाडे यांनी महिलांना सिकलसेल या आजाराची माहिती व मार्गदर्शन केले. तसेच वस्तीवरील नागरिकांना महत्वाची शासकीय कागदपत्रे काढण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. यावेळी लहान मुलांना पतंग व खाऊ वाटप करून आनंद दिला.

या कार्यक्रमास जिल्हा महिला प्रमुख ॲड. जास्वंदी भंडारी, जिल्हा महिला सहप्रमुख ॲड. चित्रा आचार्य, जिल्हा सहकोषाध्यक्ष ॲड. जयश्री देशमुख, भुसावळ तालुका महिला प्रमुख तथा व्हॉईस ऑफ मिडिया महिला विंगच्या राज्यकार्यकारिणी जनसंपर्क प्रमुख पत्रकार उज्वला बागुल तसेच पूर्णवेळ कार्यकर्ता वीरसिंग वसावे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावाचे सरपंच प्रताप चव्हाण, उपसरपंच रेखाताई पारधी, ग्रामपंचायत सदस्य भास्कर साळुंके, गोपीचंद सुरवाडे, राजू सुरवाडे तसेच अंगणवाडी सेविका कल्पनाताई साळुंके यांनी मोलाचे सहकार्य केले.