भुसावळात पोस्टल मतदानाच्या दुसऱ्या दिवशी 219 मतदान असे एकूण 524 टपाली मतदान ; सोमवारी सुद्धा मतदान सुरू ,

भुसावळ ,(प्रतिनिधी) – : भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय कर्मचारी, पोलीस, होमगार्ड तसेच निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे मतदान वाया जाऊ नये, यासाठी शनिवार व रविवार रोजी प्रांताधिकारी कार्यालयात पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली. पहिल्या दिवशी 305 व दुसऱ्या दिवशी 219 कर्मचार्‍यांनी मतदानाचा हक्क बजावल्याने एकूण 524. मतदान झाले सकाळी 10 ते संध्याकाळी 6 यावेळेत ही प्रक्रिया सुरू होती

.टपाली मतदानाच्या दुसऱ्या दिवशी 219 असे एकूण 524 टपाली मतदान झाले व उर्वरित टपाली मतदानासाठी उद्या दिनांक 1/12/2025 रोजी सकाळी तहसील कार्यालय भुसावळ येथे टपाली मतदानाची आयोजन करण्यात आलेले आहे.

शिस्तबद्ध वातावरणात मतदान

सकाळी 10 वाजता पोस्टल मतदानास प्रारंभ झाला. कागदपत्रांची पडताळणी करून पात्र कर्मचार्‍यांना पोस्टल बॅलेट देण्यात आले. मतदान केंद्रात सीसीटीव्ही निरीक्षण, मदत कक्ष, दिव्यांग कर्मचार्‍यांसाठी सुविधा अशा आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या होत्या.
निवडणुकीच्या दिवशी शहरातील विविध मतदान केंद्रांवर ड्युटीवर राहणार्‍या कर्मचार्‍यांसाठी ही सोय मोठा दिलासा ठरली आहे. . प्रांताधिकारी कार्यालयात सकाळपासूनच कर्मचार्‍यांची रांग दिसून आली. ओळखपत्र तपासणी केल्यानंतर संबंधितांना मतदान कक्षात प्रवेश देण्यात आला

दरम्यान. आज दिनांक 30 11 2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे तापी सभागृहात एकूण 25 सेक्टर ऑफिसर यांची आढावा बैठक घेण्यात आली याप्रसंगी त्यांना मतदानाच्या दिवशी व साहित्य वाटपच्या दिवशी करावयाची कामे व आपला स्थिती याबाबत विविध सूचना देण्यात आल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील व नायब तहसीलदार संतोष विनंते उपस्थित होते.

खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांची गर्दी

प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी हे दैनंदिन निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असल्याने कार्यालयात दररोज गर्दी होत आहे. खर्च वेळेत सादर न केल्यास कारणे दाखवा नोटीस पाठवली जाते, म्हणून उमेदवार सकाळी 11 ते संध्याकाळी उशिरापर्यंत खर्च सादर करण्यासाठी उपस्थित राहत आहेत.