भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारणी घोषीत :

जळगाव (प्रतिनिधी ) -: येथील यशवंत भवन, वाघ नगर, जळगाव केंद्रीय कार्यकरणीचे संस्कार विभागाचे प्रमुख डॉ. एस एस वानखेडे, केंद्रीय कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी, नाशिक विभागीय प्रभारी निलेश पवार, राज्य सचिव डॉ .के. वाय. सुरवाडे , राज्य संघटक लता तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्हा पूर्व ची कार्यकारणी एकमताने निवड करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली.
जिल्हा अध्यक्ष पदी रवींद्र तथा सुमंगल अहिरे,सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे,
कोषाध्यक्ष डॉ .संजीवकुमार साळवे,उपाध्यक्ष (प्रचार पर्यटन)प्रकाश सरदार,उपाध्यक्ष (संस्कार) भीमराव पवार व संघरत्न दामोदरे,उपाध्यक्ष (समता सैनिक दल)युवराज नरवाडे,
कार्यालयीन सचिव शैलेंद्र जाधव,हिशोब तपासनीस पंडित सपकाळे, सचिव (प्रचार पर्यटन) वसंत लोखंडे व सुनील अढागळे, सचिव (समता सैनिक दल) रमेश साळवे व प्रमोद पोहेकर, जिल्हा संघटक(जळगाव )
सुभाष सपकाळे,(बोदवड) उत्तम खराटे,(रावेर )विजय अवसरमल,(भुसावळ )ए. टी. सुरडकर, (मुक्ताईनगर)दिलीप पोहेकर,(चोपडा )बापुराव वाढे या प्रमाणे निवड करण्यात आली.
या बैठकीला जिल्हयातून भारतीय बौद्ध महासभा चे मोठ्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित होते. त्यामध्ये महिला जिल्हा अध्यक्ष प्रियांका अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हा सचिव (समता सैनिक दल) वनिता साळवे,रवींद्र मोरे, राजेश इंगळे, डोंगरे, बी. के. बोदडे,
जयपाल धुरंधर, विजय भोसले, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .
आभार सुशीलकुमार हिवाळे यांनी मानले.

फोटो ओळ _ नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष सुमंगल अहिरे यांचे स्वागत करताना डावी कडून लता तायडे, वैशाली सरदार