भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक पीपार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन डिसेंबरला दोन तालुका पातळीवरील न्यायालयांना स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे

या आदेशानुसार चाळीसगाव , पाचोरा , भडगाव ,भुसावळ , यावल ,रावेर , मुक्ताईनगर , जामनेर , अमळनेर ,चोपडा ,धरणगाव , एरंडोल , आणि पारोळा येथील न्यायालय व कार्यालय या दिवशी पूर्णपणे बंद राहणार आहे. जळगाव जिल्हा न्यायालय आणि मुख्यालयातील सर्व अपिलीय दिवाणी व फौजदारी न्यायालय नियमीते सुरू राहतील अशी माहिती न्यायालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे .
निवडणुकीचे कामकाज व्यवस्थित पार पडता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे . सुट्टीची भरपाई म्हणून 27 डिसेंबरला चौथा शनिवार रोजी बोदवड न्यायालय व जळगाव जिल्हा न्यायालय वगळता अन्य सर्व तालुका न्यायालय व कार्यालये सुरू राहतील संबंधितांनी अशी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचना आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे


