भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका व ज्यांना नुकताच राजनंदिनी बहुऊद्येशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षीका पुरस्कार मिळाला होता त्यांच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ईचलकरंजी येथील शाहु महोत्सवात त्यांना मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहु नारीरत्न पुरस्कार २०२५ देवुन गौरवण्यात येणार आहे.सत्कारमुर्तींना शाल,श्रीफळ,पगडी,सन्मानपत्र व सन्मान ट्राफी देवुन शाहु महाराजा व अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल. त्यांच्या निवडीचे निमंत्रण लेखी पत्राने संकल्पना प्रमुख अरुण रंजना कांबळे यांनी कळवीले आहे.या संदर्भात अरुणजी कांबळे यांनी नमुद केले की हा महोत्सव तिन दिवस चालणार असुन यात विवीध स्पर्धा,मनोरंजनात्मक,सामाजीक,सांस्क्रुतीक व ऊपबोधत्मक कार्यक्रमाची रेलचेल असुन सांगता समारोह ३० नोव्हेंबर ला होणार असुन जवळपास २५ नामवंताना आपआपल्या क्षेत्रात केलेल्या कामगीरीच्या आधारे सन्मानीत करण्यात येणार आहे.
पुनम फालक यांनी प्रतीकुल परीस्थीतीवर मात करुन संसाररथ यशस्वीपणे हाकत असुन अनेक आव्हांनांना तोंड देवुन आपल्या अपत्यांना ऊच्च विद्याविभुषीत करण्याचा मानस ठेवुन आपल्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी सुध्दा त्या मेहनत घेतात.विद्यार्थीहित हेच अंतीम ध्येयाने प्रेरीत होवुन त्या शाळेच्या ऊज्वल नावासाठी झटत असतात.लग्नानंतर त्यांनी शिक्षण पुर्ण केले असुन त्या जयलक्ष्मी अँकेडेमी च्या प्रमुख आधारस्तंभ आहेत.
त्यांच्या या निवडीबद्यल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष मोहन फालक,चेअरमन महेश फालक ,सेक्रेटरी विष्णुभाऊ चौधरी,कोषाध्यक्ष संजय नाहाटा व सर्व पदाधीकारी,भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.आर.पी.फालक ताप्ती पब्लीक स्कुल च्या मुख्याध्यापीका निना कटलर,
ऊपमुख्याध्यापीका श्रध्दाली घुले,मनप्रीत कौर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर ,स्वामीसमर्थ शिक्षण संस्थेच्या कांचन नेमाडे,जगन्नाथ नेमाडे, व मित्रपरीवारांनी अभिनंदन केले आहे.



