भुसावळ शहर न. पा. पथ विक्रेता समितीचे भुसावळ येथे उपोषण मागे

भुसावळ ( प्रतिनिधी) –
भुसावळ येथे पथ विक्रेता संघटने(हॉकर्स ) तर्फे विविध मागण्यासाठी दोन दिवसापासून सुरू असलेले उपोषण माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते मागे घेण्यात आले आहे .
नगरपालीका मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले असुन उपोषण कर्ते यांना ट्रामा सेंटर येथे पाठविण्यात आले आहे .
भोगवटा पावती सहीत जागा उपलब्ध करून देणे ,
स्ट्रीट लाईटचे पोल लावुन देणे , जी जागा उपलब्ध करून दिलेली आहे तेथे कॉक्रीटीकरण करणे.
जागेवर सी.सी.टी.वी. कॅमेरे लावणे ,
नियोजित जागेवर डोम मार्केट उभारणे ,
जो पर्यत आमच्या वरील नमुद केलेल्या मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत आम्हाला आहे त्याच जागेवरच व्यवसाय करण्याची परवानगी देणे , याप्रमाणे भुसावळ.पथ विक्रेता समिती व राष्ट्रीय हॉकर्स संघटना यांच्या मागण्या आहेत .
उपोषणासाठी संघटनेचे अध्यक्ष राजु सपकाळे मुकेश जैन , आरीफ शेख , निलेश भदाडे व पदाधिकारी व कार्यकर्ते बसलेले होते .