भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दि.१२रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा- 2025 आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. जी.आर.वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा. डॉ. चंद्रकांत सरोदे, प्रमुख वक्ते प्रा.प्रणिता राणे,प्रा.नेहा महाजन,प्रा.डॉ.स्वाती महाजन, प्रा.डॉ.दीनानाथ पाठक उपस्थित होते. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.जी.आर.वाणी यांनी विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा अधिकाधिक लाभ घ्यावा व पोलीस भरती परीक्षा पास व्हावे असे सांगितले. सदर कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. बी.एच.ब-हाटे,उपप्राचार्य प्रा.डॉ.डी.एन.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यशाळेस अंकगणित या घटकावर प्रा.प्रणिता राणे, बुद्धिमत्ता चाचणी प्रा.नेहा महाजन मराठी व्याकरण घटकावर प्रा. डॉ. स्वाती महाजन आणि प्रा.डॉ. दीनानाथ पाठक यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास प्रा.डॉ.संगीता भिरुड प्रा. वंदना महाजन उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. स्वाती महाजन यांनी मानले. सदर कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व प्राद्यापकांचे सहकार्य लाभले. सदर कार्यशाळेचा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

फोटो कॅप्शन- पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा -2025 उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक डॉ. चंद्रकांत सरोदे आदी


