भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील चक्रधर नगर मधील जैन स्थानक गादिया पौषध शालामध्ये श्रुतधर आचार्य प.पु.प्रकाश मुनीजी म.सा.यांच्या आज्ञानुवर्ती जैन साध्वी खुशालीजी म.सा. आदि ठाणा चार यांचा चातुर्मास चालू आहे. या चातुर्मासात एक विचारणीय व संस्मरणीय धार्मिक घटना घडलेली आहे .जी एक अशक्य बाब होती ती ठाम मनोदयाने शक्य झाली.

येथील सुशिक्षित,सुसंस्क्रुत धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रांमध्ये नावलौकिक असलेले व तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत असलेले विजय फालक व त्यांचे कुटुंबीय यांनी साध्वींच्या प्रेरणेने तहहयात मांसाहार करणार नाही याची शपथ घेतली असून फक्त एकोणावीस वर्षीय तरुण युवक व जयलक्ष्मी अकॅडमीचे संचालक जय फालक याने आजन्म मदिरा सेवन, धूम्रपान, गुटखा ,तंबाखू, हुक्का सेवन,जुगार या गोष्टी सुद्धा करणार नाही याची सुद्धा स्वतःहून साध्वीजिंकडे इच्छा व्यक्त करून शपथ घेतली.
लावण्या फालक ही युवती बाहेर शहरात एम.बी.ए चे उच्च शिक्षण घेत असुन तीने सुध्दा मांसाहार त्याग करुन युवती पुढे आदर्श ठेवला. साध्वीजींनी या कुटुंबाला मनापासून धन्यवाद देऊन त्यांनी घेतलेल्या अशक्यप्राय गोष्टींची शपथ याविषयी मार्मिक विवेचन केले. तसेच त्यांना या बाबींचे महत्व पटवुन दिले.
आज युवक वर्ग हा अध:पतनाकडे भरकट चाललेला असुन फालक कुटुंब व भावा बहिणींनी मात्र या सर्व कुव्यसनापासुन फारकत घेतली आहे याबाबत त्यांची प्रशंसा केली. तसेच आपण हा वारसा पुढे सुद्धा चालवणार असून अनेकांना या गोष्टीपासून प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करू व मी स्वामीसमर्थांची भक्त असुन त्यांच्याच क्रुपेने हे घडुन आले असावे, असे विद्यार्थी प्रिय ताप्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका,सुसंस्कारीत कुटुंब नायीका सौ. पुनम फालक यांनी मानस व्यक्त केला .त्यांच्या या कृती मागे ज्येष्ठ सुश्राविका व स्वाध्यायी सौ. शोभा ललवाणी यांची प्रेरणा होती व सौ. शोभा ललवाणी यांनी सुद्धा या कुटुंबाचे आभार व्यक्त केले की त्यांनी माझ्या इच्छेचा मान राखून हा दृढ संकल्प केला. त्यांच्या या अध्यात्मिक बाबीचे व कठोर निर्णय धारण केल्याबाबत जेष्ठ सुश्रावक व जैन कॉन्फरन्सचे प्रेमभाऊ कोटेचा, चातुर्मास समिती अध्यक्ष, टॅक्स कन्सल्टंट प्रशांत कोटेचा, आनंद ड्रेसचे संचालक सुनील कोटेचा,सोसायटी साडी सेंटरचे हेमंत मंडलेचा, कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डाँ.डि.एम.ललवाणी,डाँ. संजय गादिया, विजय गादिया, दिनेश संचेती, मदनलालजी ललवाणी,शिवसेना नेते ललीत मुथा,प्रा.आर टि.सुराणा,डाॅ.संदीप कोटेचा,सचिन डेलीवाल,सौ.पारस नाहाटा,सौ.ज्योती गादिया,सौ.संगीता मुगदिया,सौ.मंगला कोटेचा आदी अनेक माननीय व्यक्तींनी व जैन महिलांनी त्या परिवाराला धन्यवाद देऊन एका चांगल्या संकल्पनेची आपण मुहूर्तमेढ रोवली याबद्दल त्यांचे कौतुक केले.


