देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्हा महिला कार्यकर्त्यांची लघु कार्यशाळा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्हा महिला कार्यकर्त्यांची लघु कार्यशाळा दिनांक ९ रोजी डॉ किशोर दादा मोरे यांच्या बाजुला असलेल्या हॉलमध्ये संपन्न झाली . यावेळी जिल्हा सचिव श्री काशीराम बारेला सर यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थापनेच्या इतिहासासह , आपल्या आयामांचे कार्य कश्या पध्दतीने चालते याविषयी सखोल माहिती दिली
चित्राताई पुराणिक यांनी सप्त बिंदुवर आधारीत कार्य याविषयी मार्गदर्शन केले ॲड चित्रा आचार्य व ॲड जास्वंदी भंडारी यांनी महिन्या भरातील कामांचा आढावा घेतला

सदर बैठकीला जिल्हा, भुसावळ तालुका व नगरीत कार्यकर्ते सह क्षेत्र खेलकुद प्रमुख श्री मधुकर वाणी सर व नगरीय जनसंपर्क निधी संकलन प्रमुख मुकुंद दादा प्रचंड यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते