भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील सक्षम नारी फाउंडेशनने शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत शिक्षिकेसह जेष्ठ शिक्षिका यांचा सत्कार करून सन्मान करीत अनोखा शिक्षक दिन साजरा केला . 5 सप्टेंबर रोजी आपण भारताचे महान तत्त्वज्ञ, विचारवंत आणि राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन “शिक्षक दिन” म्हणून साजरा करतो. त्यांनी सांगितले होते —
“खरे शिक्षक तेच, जे आपल्याला विचार करायला शिकवतात.” शिक्षक असे दीपस्तंभ आहेत जे अपरिपक्व मनांना आकार देतात, कुतूहल जागवतात आणि अमर्याद स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी प्रोत्साहित करतात.
शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाहीत, तर जीवनमूल्ये रुजवतात, चारित्र्य घडवतात ,आणि समाजाला योग्य दिशा देतात.
आपल्या जीवनात असे अनेक परिचित, अपरिचित शिक्षक असतात. सक्षम नारी फाउंडेशनतर्फे अशाच जीवनावश्यक मुल्ये शिकवणाऱ्या खालील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
१. पारूल वर्मा ज्या झुंबा च्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी मदत करत आहेत.


- चारू भालेराव व रमाकांत भालेराव सर: नुपूर कथ्थक अॅकॅडमी मार्फत भुसावळ सारख्या छोट्या ठिकाणी आपल्या कथ्थक नृत्य, वादन, चित्रकला अशा अनेक कलांनी हे दाम्पत्य अनेक मुलांना ज्ञान अर्जित करत आहेत तसेच जीवनातील आनंद शोधण्याचे शिक्षण देत आहेत.
- श्रीमती मीनाक्षी सोनारः प्रत्येक आई ही पहिली शिक्षिका असते. अश्याच ह्या आईचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.
- श्रीमती शकुंतला जगताप : एक प्रेमळ सासू व पूर्ण घराला संस्कारांचे शिक्षण देणाऱ्या ह्या माऊलीचाही सत्कार करण्यात आला.
- श्रीमती विद्या रामवंशी: माजी मुख्याध्यापिका ज्यांनी आपल्या मार्गदर्शनाने हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य फुलविले.
ह्या प्रसंगी सक्षम नारी फाउंडेशनचे डॉ. सुवर्णा गाडेकर, सुनिता जोशी, मंजु शर्मा, योगिता ठाकूर, पल्लवी अंबाडे, वंदना हंस, संगिता जगताप, शीतल भालेराव व डॉ. वैशाली रामवंशी ह्यांची उपस्थिती होती.



