भुसावळ (प्रतिनिधी) – श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी सरस्वती मातेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे अनन्य साधारण असे महत्व असते. विद्यार्थ्याचे सर्वांग सुंदर जीवन घडविण्याचे महान कार्य शिक्षकच करू शकतो. सरांनी आचार्य चाणक्य यांचे उदाहरण देऊन शिक्षकाची क्षमता किती असते हे पटवून दिले.

प्राचार्य जोशी म्हणाले की, डॉ राधाकृष्णन हे आदर्श शिक्षक होते, त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान करण्याची प्रथा पडली आहे. जीवनाची दिशा व दिशा शिक्षक बदलून टाकतो , शिक्षक हा आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना घडवत असतो. सर्व विद्यार्थ्यांनी नेहमी शिस्तीचे पालन करावे व नम्र असावे असे सांगितले. तसेच अनेक उदाहरण देऊन थोर महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे व जीवनात यशस्वी व्हावे असेही सांगितले.
याप्रसंगी डॉ. सुधीर शर्मा व प्रा. ज्योती ओस्तवाल यांनीही आपले विचार व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचे सन्मान केले. कार्यक्रमात समस्त प्राध्यापक विचार मांडले. सर्व प्राध्यापकांनी अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी विद्यापीठ गीत प्रस्तुत केले. नवप्रवेशित विद्यार्थिनींचे ही स्वागत या प्रसंगी केले गेले.. याप्रसंगी बीए व बीकॉम च्या विद्यार्थिनींनी, एकता , रोशनी दीक्षा मोर शिफा शेख, मीना शेख यांनी आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थिनींनी शब्दसुमनांनीही सर्व प्राध्यापकांचे स्वागत केले. कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी नेहमी ध्येयासक्त असावे.
शिक्षक हा आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना घडवत असतो. सर्व विद्यार्थ्यांनी नेहमी शिस्तीचे पालन करावे व नम्र असावे असे सांगितले. तसेच अनेक उदाहरण देऊन थोर महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे व जीवनात यशस्वी व्हावे असेही सांगितले. याप्रसंगी डॉ. सुधीर शर्मा व प्रा. ज्योती ओस्तवाल यांनीही आपले विचार व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचे सन्मान केले.
कार्यक्रमात समस्त प्राध्यापक गण व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले तसेच क्लासरूमला सुंदर सजवले होते. कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.


