पतंजली योग समिती भुसावळतर्फे साजरा केला शिक्षक दिन.

भुसावळ (प्रतिनिधी ) –
सुरुवातीला दीप प्रज्वलन राठी सर , स्वाभिमानचे प्रजापती भवरलाल सर यांच्या हस्ते करण्यात आले .

योगशिक्षिका वर्षा ताई लोखंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक दंगल पाटील सर यांनी शिक्षक दिन व योगा विषयी मार्गदर्शन केले
राज्य कार्यकारिणी सदस्या महानंदाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम पार पडला.
ज्या योग शिक्षिका सेवा देत आहेत, त्यांना सर्वांना शिक्षक दिना निमित्त भेटवस्तू देऊन योग शिक्षकांना सन्मानित करण्यात आले .
आम्ही सर्वच योग शिक्षिका नेहमीच त्यांचा आदर्श समोर ठेवून कार्य करत असतो. प्रसंगी मंदाकिनी केदारे यांनी गुरुवर्यांसाठी छान कविता सादर केली. कार्यक्रमाचे आभार अंजलीताई वाघमारे यांनी केले.
आजच्या कार्यक्रमाला चहाची व्यवस्था संत धाम योग वर्ग योगशिक्षिका राजश्रीताई बादशहा यांनी केलेली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगिनी योग वर्ग यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला महानंदाताई पाटील, अंजली वाघमारे, वर्षा लोखंडे, मंदाकिनी केदारे, राजश्री बादशाह, मीना राजपूत, वंदना जंगले, पुनम संकला, माला चौधरी, सुरेखा पाटील, नीलिमा पाटील, हेमा पाटील, ललिता चौधरी ,प्रभाकर झांबरे सर , टी एस बाविस्कर सर या योगशिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.