मुलींनी अभ्यासा बरोबरच खेळाला सुद्धा तेवढेच महत्त्व द्यावे- रजनी सावकारे; शालेय बुद्धिबळ स्पर्धा स्पर्धा उत्साह संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे सेंट अलॉयसेस स्कूल भुसावळ येथे शालेय शासकीय तालुकास्तरीय मुलींच्या 14, 17, 19, वयोगटाच्या बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रतिष्ठा महिला मंडळाचे अध्यक्ष सौ रजनी सावकारे यांच्या हस्ते चेस बोर्ड वरती सोंगट्यांची चाल चालुन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी शालेय पोषण आहार अधीक्षक बी.डी. धाडी हे होते. सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ,भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक डॉ. प्रदीप साखरे, मेघश्याम शिंदे यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक खेळाडू प्रशिक्षक पंच उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. प्रदीप साखरे यांनी स्पर्धेविषयी ची माहिती दिली. प्रसंगी उद्घाटक रजनीताई सावकारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले . कारण आपल्या सहभागाशिवाय कोणी हरु आणि जिंकू शकणार नाही. मुलींनी अभ्यासाबरोबरच खेळायला सुद्धा तेवढेच महत्त्व दिले पाहिजे व स्वतः स्वयं सिद्धा व आत्मनिर्भर बनल्या पाहिजे. सर्व खेळाडूंनी स्पर्धेत आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून यश संपादन करावे. जिंकलेल्या संघांनी आपल्या तालुका जिल्हा राज्याचे नाव उंचावून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत कसे जाता येईल यासाठी प्रयत्न करावे. तालुक्याचे जिल्हास्तरावरती प्रतिनिधित्व करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य शिला व कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. डी. धाडी यांनी सहभागी खेळाडूंच्या अभिनंदन करून विजया साठी शुभेच्छा दिल्या स्पर्धेत 57 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल खाली याप्रमाणे. 14 वर्षाखालील निकाल
1)प्रियंका इंगळे महात्मा गांधी विद्यालय वरणगाव २)श्रद्धा सपकाळे अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ
3)रिद्धी ठाकरे , द वर्ड स्कूल भुसावळ
4)खुशबू तडवी के नारखेडे विद्यालय
5) निधी जंगले , सेंट अलायसेस .
17 वर्षाखालील निकाल
1) भाग्यश्री ओगले अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ
2) रूपल नेहते के नारखेडे विद्यालय भुसावळ.
3) आर्या पवार सेंट अलायसेस भुसावळ
4)निजिया पिंजारी बी झेड उर्दू भुसावळ .
5)सिद्धी टेंभुर्णीकर ,सेंट अलायसेस.
19 वर्षे खालील मुली निकाल
1)विधीहा पाटील -महात्मा गांधी वरणगाव.
२)आसिफा खान
3)अलेना फारुख
4)अल्फिया पटेल 5)फलक अहमद , सर्व बी झेड कॉलेज भुसावळ
जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी व विजया साठी सर्वं खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या . मुख्य ऑर्बिट म्हणून मिलिंद शिरोडे यांनी पंच म्हणून श्रीमती नम्रता गुरव, प्रदीप सपकाळे, लक्ष्मीकांत नेमाडे, अझर सर , सुमितदास गुप्ता , बॉबी पवार , तौसीफ कुरेशी , निलेश राजपूत,गणेश बोदडे , अलेस्टर सिमोन्स, दत्तु अहीरे, अजय डोळे, आदीनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे तालुका पदाधिकारी व सेंट अलॉयसेस स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन मेघेश्याम शिंदे यांनी केले.