भुसावळ ( प्रतिनिधी )
श्री संत सेना महाराज सामाजिक सभागृह व नाभिक संघ भुसावळ शहर कार्यकारिणीच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी करण्यात आली .
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंडित बोरनारे गुरुजी हे होते, प्रमुख पाहुणे समाजसेवक प्रमोद सावकारे,नितीन श्रीरामे, समिती अध्यक्ष अभय सूर्यवंशी, उपाध्यक्ष भिका बाणाईत, छोगालाल सोनवणे ,भूषण सैंदाणे, सरपंच नीलम सोनवणे, चित्रा सोनवणे अनिता आंबेकर,अध्यक्ष संजय बोरसे कार्याध्यक्ष अनिल टोंगे, उदय सोनवणे,उपस्थित होते .

यावेळी गजानन महाराज मंदिरापासून दिंडी सोहळ्यात सुरुवात झाली नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिल्ड व सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला तसेच नुकतेच ग्राम विकास अधिकारी म्हणून रोहित गोपाळ बाणाईत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी विद्यार्थ्यांना व्हायब्रंट अकॅडमीचे जगदीश खंबायत यांनी मुलांना स्पर्धा परीक्षा एनडीए बद्दल सुंदर माहिती दिली नंतर न्हावी समाजातील जाती पोट जाती मधील अंतर कमी करून ज्यांनी विवाह केला आहे त्यांचा नाभिक संघाकडून साडी व ड्रेस वधूवरास देऊन गौरव करण्यात आला .
यावेळी दातृत्व सन्मान पुरुषोत्तम सणांसे यांनी नाभिक संघास 21000 रुपये देणगी दिली . प्रसंगी बंटी सोनवणे व अनिता आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत बाणाईत तर सूत्रसंचालन डॉक्टर नरेंद्र महाले यांनी केले कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात समाज बांधव व भगिनी उपस्थीत होते .


