भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कृषि विभाग तर्फे शुक्रवार रोजी मौजे वेल्हाळे ता. भुसावळ येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान योजनेतंर्गत मुग पीक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण वर्ग ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आला .
वेल्हाळे येथे 2025 खरिप हंगामात मुगानंतर गहू हे प्रात्यक्षिक सर्वज्ञ आणि श्रीगणेश महिला शेतकरी गटासाठी राबविण्यात आले आहे, या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण वर्गा धीरज नेहेते, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, पाल यांनी महिला शेतकऱ्यांना मुग पिक फुलोरा अवस्थेत घ्यावयाची काळजी, खत, पाणी व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन, जैविक कीड नियंत्रण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तर शुभम मॅडम तालुका कृषि अधिकारी, भुसावळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत महिला शेतकऱ्यांना जैविक कीड नियंत्रणाचे महत्त्व, उपलब्धता याविषयी महिलांना मार्गदर्शन केले.
तसेच . अतुल चौधरी, मंडळ कृषि अधिकारी, वरणगाव यांनी महिलांना प्रकिया उद्योगाचे महत्त्व सांगितले प्रवीण बाविस्कर, उपकृषि अधिकारी, वरणगाव-1 यांनी विविध कृषि योजनांची महिलांना माहिती दिली. प्रमोद जाधव, बीटीम, आत्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व शेतकरी गटांचे महत्त्व व योजनांविषयी माहिती दिली श्रीमती संगिता पाटील, सकृअ वेल्हाळे यांनी कृषि क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग याविषयी माहिती देत उपस्थित सर्व महिला शेतकऱ्यांचे आभार मानले . प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी वेल्हाळे येथील सर्वज्ञ आणि श्रीगणेश महिला शेतकरी गटाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले




