भुसावळ (प्रतिनिधी ) – गैरसमजाने विभक्त झालेल्या जोडप्याचे मनोमिलन करून त्यांना एकत्र आणून त्यांचा संसार फुलविण्यात जळगाव जिल्हा तेलीसमाज तंटामुक्ती समितीला यश आले आहे .

. प्रणव रमेश चौधरी राहणार काठे गल्ली नाशिक व पत्नी सौ निखिता प्रणव चौधरी राहणार चाळीसगाव यांचे मागील सहा महिन्यापासून आपसात काही गैरसमजातून वाद व तणाव निर्माण झाला व वाद विकोपाला जाऊ लागला . मात्र विस्कटलेले कुटूंब एकत्र आणण्यासाठी कुटुंबाने जळगाव जिल्हा तेलीसमाज तंटामुक्ती समिती कडे आपली कैफियत मांडली यावरून या दोघा उभयतांचे व कुटुंबाचे म्हणणे ऐकून त्यांचे आपसातील वाद मिटवण्यास दिनांक 9/3/2025 वार रविवार रोजी पुन्हा एक कुटुंब वाचवण्यात तंटामुक्ती समितीला यश आले आहे . दोघांमधील असलेल्या आपसीवादा संदर्भात तंटामुक्ती समिती जळगाव जिल्हा यांच्यामार्फत चाळीसगाव येथे तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष दिलीप रामराव चौधरी यांच्या निवासस्थानी दोघे परिवाराचे बैठक घेण्यात आली .यावेळी दोघांचा गैरसमज दूर करून दोघांना एकत्र आणण्यास तंटामुक्ती समितीने उभयतांना महत्वपूर्ण असा मौलिक सल्ला देत उपदेश केले . दोघाच्या हितासाठी व कुटुंबाबरोबरच समाज उन्नती व प्रगत समाज निर्मिती करीता समाजातील अर्थात काही गैरसमजाने विभक्त झालेल्या कुटुंबांनी वा जोडप्याने जळगाव जिल्हा तेलीसमाज तंटामुक्ती समितीकडे निःसंकोचपणे आपली कैफियत मांडावी समितीचा सल्ला घ्यावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे .
याप्रसंगी जळगाव जिल्हा तंटामुक्ती समितीच्या समितीचे कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय तुकाराम चौधरी जळगाव जिल्हा तंटामुक्तीचे जिल्हा सचिव श्री अनिल रामदास पाटील तंटामुक्तीचे उपाध्यक्ष श्री दिलीप रामराव चौधरीश्री मधुकर किसन देवरे
भगवान फकीरा सोनवणे अशोक नामदेव चौधरी भुसावळ श्री बाबुराव गोवाजी चौधरी नाशिक प्रदीप हरिभाऊ चौधरी चोपडा निलेश पारिख नाशिक श्री रमेश वना चौधरी नाशिक श्री विजय अंबर महाले चाळीसगाव कल्पेश विजय महाले सुरेश वना चौधरी अरुण रामदास चौधरी पारोळाआधी पदाधिकारी उपस्थित होते.


