भुसावळ विभागातील म्हसावद स्थानक येथे यार्ड पुनर्रचना कार्य साठी विशेष ब्लॉक; 4 गाड्या रद्द


भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ विभागातील म्हसावद स्थानक येथे अप लूप लाईन विस्तारीकरण अप लूप लाईन ७१४ मीटरवरून ७५६ मीटरपर्यंत विस्तार तसेच गतीवाढीकरण यासाठी यार्ड पुनर्रचना कार्य हाती घेण्यात येत आहे. यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य तसेच ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा काही गाड्यांच्या वाहतुकीवर पुढील प्रमाणे परिणाम होणार आहे.
गाड्यांचे रद्दीकरण –
दिनांक: 23.03.2025 ते 26.03.2025 या कालावधीत खालील प्रमाणे गाड्या रद्द राहतील:
1) गाडी क्रमांक 11113 देवळाली ते भुसावळ मेमू
2) गाडी क्रमांक 11114 भुसावळ ते देवळाली मेमू
3) गाडी क्रमांक 01212 नाशिक ते बडनेरा मेमू
4) गाडी क्रमांक 01211 बडनेरा ते नाशिक मेमू

रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.