भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील बियाणी मिलिटरी स्कूल येथे दिनांक 21 मार्च रोजी वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी तर प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश जोशी, व बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी व विशेष अतिथी म्हणून राजू पारीख व प्रवीण भराडीया उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .विद्यार्थ्यांनी प्रथम स्वागत गीत सादर केले.मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस वितरण करण्यातआले. याप्रसंगी डॉ. रमेश जोशी यांनी शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनाचे अविभाज्य अंग असून बियाणी मिलिटरी स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्पर्धेत जिंकणाऱ्या सोबत पराजित होणारा प्रतिस्पर्धी हा देखील महत्त्वाचा असतो याचे महत्त्व विशद केले.अभ्यासा सोबत विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक विकासावर भर द्याव असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बियाणी एज्युकेशनच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डी एम पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.

फोटो कॅप्शन – विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करताना मनोज बियाणी सोबत डॉ रमेश जोशी,डॉ संगीता बियाणी,राजू पारिक,प्रवीण भराडिया, प्रिन्सिपल डी एम पाटील,रुद्रसेन गंठिया,कांचन जोशी आदी


