भुसावळ (प्रतिनिधी ) – नुकताच 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात व धुमधडाक्याने महिलांनी साजरा केला .यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले याच अनुषगाने भुसावळातील स्वामिनी महिला गृपच्या महिलांनी एकत्र येऊन येथील वीट भट्टी येथे काम करणाऱ्या महिलांसोबत महिला दिन साजरा केला .

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामिनी गृप अध्यक्षा प्रियांका चौधरी यांनी उपस्थीत महिलांना महिला दिन का साजरा करण्यात येतो व महिला दिनाचे महत्त्व सोदाहरासाहित सांगितले . याच बरोबर आपण आपल्या आरोग्याची व स्वच्छतेची कशी काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली . कामाबरोबर स्वतःचीही काळजी घ्यावी यामुळे आपण आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घेऊ शकतो असेही सांगितले .
यावेळी उपस्थित महिला व मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले . तसेच महिलांना साड्या आणि मुलींना ड्रेसेस देण्यात येऊन गौरविण्यात आले . महिला दिनानिमित्त सर्व कष्टकरी महिलांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला .
कार्यक्रमास प्रियंका चौधरी अनिता आंबेकर , विजया निकम , रीना गायकवाड , मनीषा धांडे , पल्लवी जाधव , कविता महाले
उज्वला बागुल अजित वडनेरे उज्वला पाटील अश्विनी पाटील पल्लवी सोनार वैशू भाकरे आरती ठाकूर जया इंगळे अनिता इंगळेअमिता जोशी हर्षाली झांबरे ज्योती पवारआदी स्वामिनी सखी उपस्थित होत्या . यशस्वीतेसाठी स्वामिनी सखी यांचे सहकार्य लाभले .


